ई-लर्निंग सॉफ्टवेअरची गरज का आहे ?
तंत्रज्ञानात व शिक्षणात असलेली गरज ..........
विकास – हा तंत्रज्ञानावर अवलंबून आहे तंत्रज्ञान हे काळावर अवलंबून आहे काळ हा शिक्षणावर अवलंबून आहे.
उदा. ऋषी मुनी अध्ययनात वेदांचा वापर करत तर लिखानासाठी पंख ( पिस ) याचा वापर करत. आणि झाडाची पाने किव्हा लाकडाचा वापर करत असे. काळ बदलला, तंत्रज्ञान बदलले, माणूस बदलला. कापडाचा शोध , नंतर कागदाचा शोध लागला. लेखनी आली शाही चा वापर होऊ लागला कालांतराने .........आले ( पेन, शाही पेन, पाटी, पुस्तकचा वापर शिक्षणात करू लागले.
कालांतराने बदल झाला, तंत्रज्ञानात बदल झाला. कॉम्पुटर (संगणक) आले. टी.व्ही॰, मोबाइल,
(भ्रमणध्वनि ) यांचा वापर वाढला , ज्ञानात वाढ झाली , शिक्षण घेणे आणि देणे आणखी सोपे झाले कारण यांचा सर्वात मोठा वाटा शिक्षणाचा आहे.
शिकलो म्हणून घडलो पण तंत्रज्ञानाने साथ नसती दिली तर लवकरात लवकर विकास होऊच शकला नसता आज विद्यार्थी तंत्रज्ञानाचा वापर करून घर बसल्या शिक्षण घेऊ शकतात आणि तंत्रज्ञान विकसित आहे.
इंटरनेट चा वापर करून नवनवीन तंत्रज्ञान विद्यार्थ्यांपर्यन्त पोहचेल तर आपला आपला आणि आपल्या भारताचा जास्तीत जास्त गतीने विकास होईल आणि यातून कोणी डॉक्टर, इंजीनियर, सायंटिस्ट तर कोणी अधिकारी तर कोणी मोठा नेता राष्ट्रपति होईल.